Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › International › पत्रकारांचा प्रश्न आवडला नाही; डोनाल्ड ट्रम्प भडकले, पाहा व्हिडिओ

डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांवर भडकले, पाहा व्हिडिओ

Published On: Nov 08 2018 10:32AM | Last Updated: Nov 08 2018 11:35AMवॉशिंग्टन: पुढारी ऑनलाईन

अमेरिकेत मंगळवारी मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी वाद घातला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विचारलेले प्रश्न न आवडल्याने ट्रम्प यांनी एका पत्रकाराला असभ्य आणि क्रूर असे म्हटले. तर दुसऱ्या एका पत्रकारावर गंभीर आरोप केले. दीड तासाच्या पत्रकार परिषदेत अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी ते मायक्रोफोन सोडून निघून गेले. 

प्रसार माध्यमांचा व्यवहार हा शत्रू प्रमाणे आहे. ही खुप दुदैवाची गोष्ट असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यांनी सीएनएनचे पत्रकार जिम अॅकोस्टा यांचा प्रेस पास रद्द केला. सीएनएनच्या या पत्रकाराने अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ट्रम्प यांनी या प्रवाशांना गुन्हेगार असे म्हटले होते. दरम्यान, अमेरिकेतील पत्रकार संघटनांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. 

सीएनएनच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर भडकलेल्या ट्रम्प यांनी मला देश चालवू द्या तुम्ही सीएनएन चालवा असे उत्तर दिले. तर दुसऱ्या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, आता खुप झाले तुम्ही मायक्रोफोन खाली ठेवा.  

lmao president donald trump 🇺🇸 pic.twitter.com/4vdKjaT1Vz

— S.Y.Bichi (@SadiQBichi) November 8, 2018