Sun, Nov 18, 2018 18:29होमपेज › International › जेरुसलेमच इस्रायलची राजधानी; ट्रम्प यांच्या निर्णयाने जगात खळबळ

जेरुसलेमच इस्रायलची राजधानी; ट्रम्प यांच्या निर्णयाने जगात खळबळ

Published On: Dec 07 2017 7:10AM | Last Updated: Dec 07 2017 7:19AM

बुकमार्क करा

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल अवीबऐवजी जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून घोषित केले. त्यांनी अमेरिकेबरोबरच आंतरराष्ट्रीय नियमांना डावलून हा निर्णय घेतला. या निर्णयाने जगात खळबळ माजली आहे. अमेरिकेचा दूतावास आणि इतर कार्यालये जेरुसलेमला हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

जेरुसलेम इस्त्रायलची राजधानी घोषित करण्याच्या या निर्णयाने इस्त्रायलला आनंद झाला असला तरी जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने पश्चिम आशियात अशांतता पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर ट्रम्प यांनी हा निर्णय शांतता कायम राखण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी न दिलेला असा हा ऐतिहासिक निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

व्हाईट हाऊस प्रवक्त्याने बुधवारी या निर्णयाची घोषणा केली. मध्य आशियातील शांतता प्रक्रियेला या निर्णयाने धक्‍का पोहोचेल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. इस्रायल
आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षात जेरुसलेम नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. 1967 मध्ये सीरिया, जॉर्डन व इजिप्त यांच्याशी युद्ध केल्यानंतर इस्रायलने पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला आणि आपली राजधानी घोषित केली होती. तर पॅलेस्टाईनने आपली राजधानी जेरुसलेम असेल, अशी घोषणा पूर्वीच केली आहे. 70 वर्षांत कोणत्याही अमेरिकन सरकारने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचे धाडस केले नव्हते. अध्यक्षपद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने जेरुसलेमला राजधानी म्हणून मान्यता देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण सत्तेवर आल्यानंतर कोणी निर्णय घेतला नाही; पण ट्रम्प यांनी हे धाडस केल्याने मध्य आशियातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे दूतावास तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रक्रियेला वषर्भराचा कालावधी लागेल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा अरब देशांनी यापूर्वीच विरोध केला होता. गाझा येथे फिलीस्तानी समर्थकांनी अमेरिका आणि इस्त्रायलचे झेंडे जाळले होते. युरोपीय देशांनी देखील ट्रम्प यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : ट्रम्प यांच्या 'या' निर्णयामुळे मध्य पूर्व आशिया पुन्हा पेटणार?
पश्‍चिम आशियामध्ये ‘नवी ठिणगी