Sun, Feb 24, 2019 02:50होमपेज › International › 'त्या' दोघांच्या घटस्फोटाचे कारण ठरले गुगल मॅप!

गुगल मॅपमुळे झाला घटस्फोट!

Published On: Oct 12 2018 12:15PM | Last Updated: Oct 12 2018 12:15PMपेरू: पुढारी ऑनलाईन

तत्रंज्ञानाच्या युगात व्यक्तीचे जीवन सोपे आणि सोयीस्कर होत चालले आहे. तंत्रज्ञान जसे माणसांच्या सोईचे असते तसेच काही वेळा हेच तंत्रज्ञान माणसांचा घातही करू शकते. अशीच घटना दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात घडली आहे. आत्तापर्यंत आपण विवाह जुळवण्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी तंत्रज्ञानाचा सहज वापर करतो, पण हाच तंत्रज्ञानाचा सहज वापर घटस्फोटाचे कारण ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल मॅपमुळे घटस्फोट झाल्याची घटना पेरू देशातील लिमा येथे घडली. एक व्यक्ती गुगल मॅपद्वारे रस्ता शोधत होता. त्याचदरम्यान मॅपवर एक महिला निर्दशनास आली. त्याला ती महिला हुबेहुब त्याच्या पत्नीसारखी भासली असता त्याने मॅप झुम करून पाहिले. तर ती महिला अन्य कोणी नसुन त्याची पत्नीच होती. त्या व्यक्तीला केवळ पत्नी दिसली नसुन तिच्यासोबत अज्ञात पुरूष देखील पाहायला मिळाला. त्या दोघांच्या हालचालीवरून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय आला.

घरी गेल्यानंतर पत्नीला यासंदर्भात विचारले असता, तिने ती गोष्ट नाकारली. त्यावेळी पतीने त्या दोघांचा फोटो दाखवला असता त्यावेळी तिने दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. पतीने सोशलमिडीयावर मॅपवरील फोटो आणि पत्नीचा फोटो शेअर करत त्याने पत्नीला घटस्फोट दिला.