Sun, Dec 08, 2019 06:14होमपेज › International › भारतीय कुटुंबातील चौघांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या

भारतीय कुटुंबातील चौघांची अमेरिकेत हत्या

Published On: Jun 18 2019 11:39AM | Last Updated: Jun 18 2019 11:39AM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या आयोवा राज्यात एकाच कुटुंबातीच चार जणांची गोळ्या झाडून हल्‍या करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे आयटी कर्मचारी व त्यांच्या पत्नी, दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. 

चंद्रशेखर सुंकारा (४४), त्यांच्या पत्नी लावण्या (४१) अशी हत्‍या करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत. तर चंद्रशेखर सुकारा यांच्या १५ व १० वर्षांची दोन मुलांचाही मृतात समावेश आहे. 

मुळचे उत्‍तर प्रदेशमधील असरणारे चंद्रशेखर हे चंद्रा नावाने ओळखले जात होते. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीमध्ये ते आयटी कर्मचारी होते. हत्‍या झाल्यानंतर सुंकारा कुटुंबीयांचे मृतदेह रक्‍ताच्या थोरोळ्यात पडले होते. त्‍यांच्या घरी पाहुणे आल्‍यानंतर त्‍यांना हा प्रकार पाहावयास मिळाला. पाहुण्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर सकाळी १० वाजता पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यावेळी चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसून आल्या.

दरम्‍यान, चा चार जणांच्या हत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही. आरोपीला अटक केल्‍यानंतरच हत्‍येचे कारण समजेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.