Sat, Jul 04, 2020 10:49होमपेज › International › इराणमध्ये मेडिकल क्लिनिकमध्ये स्फोट, १९ लोकांचा मृत्यू

इराणमध्ये मेडिकल क्लिनिकमध्ये स्फोट, १९ लोकांचा मृत्यू

Last Updated: Jul 01 2020 10:41AM
तेहरान (इराण) : पुढारी ऑनलाईन 

इराणच्या उत्तर तेहरानमध्ये एका मेडिकल क्लिनिकमध्ये मोठा स्फोट झाल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लोक जखमी झाले आहेत. इराणी सरकारी चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री घडली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, तेहरानचे आपत्कालीन सेवा प्रमुख पेमॅन सबियन म्हणाले की, ही दुर्घटना गॅस कॅप्सूल स्फोटामुळे झाली. यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लोक जखमी झाले आहेत.