होमपेज › International › गर्भपातावर बंदी; हॉलिवूड सेलिब्रेटींचा विरोध

गर्भपातावर बंदी; हॉलिवूड सेलिब्रेटींचा विरोध

Published On: May 16 2019 9:15PM | Last Updated: May 17 2019 4:09PM
लॉस एंजेलिस (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील अलबामा राज्याच्या सिनेटने गर्भपातावर पूर्णत: बंदी आणणारे विधेयक मंजूर केले. गर्भपात प्रकरणात डॉक्टर दोषी आढळल्यास त्याला ९९ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद विधेयकात आहे. तसेच बलात्कार आणि घृणास्पद लैंगिक संबंध प्रकरणातही गर्भपात करण्यास सूट दिलेली नाही. यामुळे विधेयकाला महिला संघटना, हॉलिवूडमधील कलाकारांकडून जोरदार विरोध होत आहे.

प्रतिभावंत गायिका लेडी गागा, एवा डुवेर्नय, सिंथिया निक्सॉन आणि ख्रिस इव्हान्स या हॉलिवूड सेलिब्रेटींनी एकत्र येत या विधेयकाविरोधात आवाज उठविला आहे. हे विधेयक घटनेविरोधी असून हा तर महिलांच्या मूलभूत अधिकारावरचा हल्ला आहे, अशा शब्दांत त्यांनी याचा निषेध नोंदविला आहे.

अलबामाचे गर्व्हनर काय इवे यांनी या विधेकावर स्वाक्षरी केली. आता हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

मात्र, ज्यावेळी मातेच्या जीवास धोका आणि बाळाची स्थिती ठीक नसेल अशा प्रकरणात गर्भपात करण्यास सूट दिली आहे.

वाचा : मीटू झालं आता 'सेक्स स्ट्राइक' मोहीम 

हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानोने देखील गर्भपातसंबंधी कायद्‍याविरोधात महिलांना सेक्स स्ट्राइकचे आवाहन केले आहे. मिलानोने या कायद्‍याला महिलांच्‍या अधिकारांविरोधात सांगितले आहे आणि या कायद्‍याविरोधात एकत्र येण्‍याचा संदेशही दिला.