Wed, Apr 24, 2019 09:57होमपेज › International › लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला अटक 

लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला अटक 

Published On: Dec 06 2018 10:54PM | Last Updated: Dec 06 2018 10:54PM
दुबई : पुढारी ऑनलाईन

गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. एका १७ वर्षीय ब्राझिलिअन मॉडेलचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या मॉडेलने संयुक्त अरब अमिरातीच्या पोलिसांत तक्रार दिल्याने मिकावर अटकेची कारवाई करण्यात आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुराक्काबात पोलिस ठाण्यात मिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिकाने आपल्याला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा या मुलीचा आरोप आहे. मिकाला पहाटे तीन वाजताच बर दुबई भागातून अटक करण्यात आली आहे. सध्या तो आमच्या कोठडीत आहे, अशी माहिती दुबई पोलिसांच्या सूत्रांना दिली. 

दरम्यान, मिका सिंग बॉलिवूडच्या ‘मसाला अॅवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी दुबईला गेला होता. दुबईत असून, त्याच्या सुटकेसाठी मित्रमंडळींकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.