Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › International › धक्कादायक : कोंबडीवर ‘बलात्कार’; पाकमध्ये अल्पवयीन मुलास अटक 

धक्कादायक : कोंबडीवर ‘बलात्कार’; पाकमध्ये अल्पवयीन मुलास अटक 

Published On: Nov 14 2017 6:01PM | Last Updated: Nov 14 2017 6:01PM

बुकमार्क करा

लाहोर : वृत्तसंस्था

पाकमधील एका १४ वर्षीय मुलाने विकृतीचा कळस गाठतांना कोंबडीवरच ‘बलात्कार’ केला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पंजाब प्रांतातील जालापूर नावाच्या गावात ही घटना घडली. अनसर हुसेन असे या मुलाचे नाव आहे. या विकृत आणि किळसवाण्या प्रकारावर सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, मनसब अली या व्यक्तीच्या शेजारी संबंधित अल्पवयीन मुलगा राहतो. त्याने त्याच्या घरातील कोंबडी पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नसरुल्‍ला आणि तौफीक ही दोन मुले या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी अनवरची वैद्यकीय चाचणीदेखील केली आहे. त्यात त्याने कोंबडीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर अनसरने आपला ‘गुन्हा’ देखील पोलिसांसमोर कबूल केला आहे.