Tue, Oct 23, 2018 15:51



होमपेज › International › #MeTooला मिशेल ओबामांचा पाठिंबा; हे जग महिलांसाठी धोकादायक! 

#MeTooला मिशेल ओबामांचा पाठिंबा; हे जग महिलांसाठी धोकादायक! 

Published On: Oct 12 2018 2:17PM | Last Updated: Oct 12 2018 2:18PM



वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

#MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराबाबत रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली असताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मात्र  या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. 

''हे जग महिला आणि मुलींसाठी धोकादायक आहे. आता मात्र हद्द झाली'', अशा शब्दांत त्यांनी सध्यस्थितीबाबत भाष्य करत #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

#MeToo ही मोहिम भावी पिढीसाठी ठिणगी बनेल. यामुळे तरुण महिलांना त्यांचा मार्ग स्वतः निवडता येईल. हे जग मुली आणि महिलांसाठी धोकादायक आहे आणि आम्ही हे पुन्हा पुन्हा पाहत आहोत. सध्या महिलांना कमी लेखले जात आहे. त्या आवाज उठवत आहेत; मात्र त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्या त्रस्त आहेत, अशी खंत मिशेल ओबामा यांनी व्यक्त केली आहे. 

वाचा : #MeToo मोहिमेची डोनाल्ड ट्रम्पनी उडविली खिल्ली

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी मी टू मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र मिशेल ओबामा यांनी या मोहिमेच्या बाजूने आपले मत व्यक्त केले आहे.