Sat, Jun 06, 2020 14:51होमपेज › International › ...आणि वेटरने ग्राहकाला दिली ४५०० पाँडची रेड वाईन

...आणि वेटरने ग्राहकाला दिली ४५०० पाँडची रेड वाईन

Published On: May 16 2019 8:26PM | Last Updated: May 16 2019 8:44PM
मॅनचेस्टर : पुढारी ऑनलाईन

एका रेस्टॉरंट मध्ये ग्राहकाने २६० पाँड किंमतीच्या रेड वाईनची मागणी केल्यानंतर तेथील वेटरने त्या ग्राहकास अजाणतेपणे ४५०० पाँड किंमतीची रेड वाईन पिण्यास आणून दिली. ग्राहकानेही आपण सांगितलेलीच वाईन दिल्याचे समजून त्या महागड्या वाईनवर दणकून तावही मारला. ही गोष्ट लक्षात आल्यावर या हॉटेलच्या मालकाने ही गोष्ट अगदी चुकून व अजानतेपणे घडल्याने त्यास एखाद्या विनोदाप्रमाणे घेऊन ही माहिती दिलखुलासपणे ट्वीटरद्वारे सोशल मीडियामध्ये शेअरही केली. 

मॅनचेस्टर येथील हॉक्समोर या हॉटेलमध्ये ही मजेशीर घटना घडली आहे. मॅनस्टेर येथल हॉक्समोर हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित आणि मोठे हॉटेल समजले जाते. या हॉटेलच्या मालकाने या घटनेचे ट्वीट केल्यानंतर या झालेल्या विनोदाचा आनंद घेत याच्याशी संबधीत अनेक विनोदी ट्वीट अनेकांनी केले आहेत. यावर ट्वीट करताना जोनाथन डाऊनी यांनी लिहतात की, ज्याने कुणी ही चूक केली आहे तो वेटर आमचेही आदरातीथ्य करेला का ? तसेच आणखी एकाने म्हटले की, आता मॅनचेस्टरला जाण्याची वेळ आली आहे. अशी अनेक विनोदी ट्विट या घटनेसंदर्भात लोकांनी शेअर केले आहेत. 

अर्थातच तो ग्राहक अगदी भाग्यशाली ठरला. ज्याने फक्त २६० पाँड किंमतीची रेड वाईन पिण्यास मागितली आणि वेटरने अजानतेपणे त्याच तब्बल ४५०० पाँड किंमतीची रेड वाईन पिण्यास आणून दिली. हा भाग्यशाली ग्राहकही मागे पुढे न पहाता आपण दिलेल्या ऑर्डरप्रमाणेच समोर आलेली रेड वाईन असेल म्हणून त्यानेही त्या  रेड वाईनवर ताव मारला.