Fri, Oct 20, 2017 08:32होमपेज › International › ‘आभासी जगात’ फेसबुकचे पाऊल

‘आभासी जगात’ फेसबुकचे पाऊल

Published On: Oct 12 2017 11:33PM | Last Updated: Oct 12 2017 11:33PM

बुकमार्क करा

न्यूयॉर्क: वृत्तसंस्था 

सोशल नेटवर्कींगमधील आघाडीची कंपनी असलेल्या फेसबुकने गुरुवारी व्‍हर्च्युअल रिआलिटी (व्हीआर)हेडसेट सादर केला. या हेडसेटला कम्युटर किंवा मोबाईल कनेक्ट करण्याची गरज नाही. तर फक्त डोळ्याला लाऊन तुम्ही अभासी जगाचा आनंद घेऊ शकता. फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात मार्क झुकेरबर्ग यांनी हा हेडसेट सादर केला. 

 2018 च्या प्रारंभी उपलब्ध होणार्‍या या हेडसेटची किंमत 199 डॉलर (सुमारे 13 हजार) इतकी असेल. ‘ओक्युलुस गो’ असे या हेडसेटचे नाव असून यातही तीन प्रकार असणार आहेत. व्हीआर हेडसेट 1 अब्ज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस झुकेरबर्ग यांनी व्यक्त केला आहे. या हेडसेटच्या माध्यामातून दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना इतर लोकांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही झुकरबर्ग यांनी सांगितले. फेसबुकचा व्हीआर हेडसेट फक्त गेमिंगसाठी नव्हे तर यात व्हिडिओ पाहता येतील आणि सोशल नेटवर्कींंगशी कनेक्ट राहता येईल. 

काय आहे व्‍हर्च्युअल रिआलिटी? 

व्‍हर्च्युअल रिआलिटी ज्याला ‘अभासी प्रत्यक्षता’ म्हणता येईल हे तंत्र मोठ्या वेगाने विकसित होत आहे. एक मोठ्या आकाराचा गॉगल डोळयावर लावून तुम्ही गेम खेळू शकता किंवा एखादे ठिकाण पाहू शकता. सध्या बाजारात उपलब्ध असलेला व्हीआर मोबाईल किंवा कॅम्युटरशी जोडून त्यात असलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने गेम खेळता येतात. एखाद्या खेळाचा किंवा ठिकाणाचा प्रत्यक्ष थरार तुम्हाला यात घेत येतो.