Sun, May 31, 2020 16:10होमपेज › International › इक्‍वेडोरमध्ये मृतदेह रस्त्यांवरच पडून 

इक्‍वेडोरमध्ये मृतदेह रस्त्यांवरच पडून 

Last Updated: Apr 07 2020 11:06PM
क्‍विटो ः वृत्तसंस्था 

कोरोना महारोगराईमुळे लॅटिन अमेरिकेतील देश इक्‍वेडोरमध्येही अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे मृतदेह उचलणारेच कुणी नसल्याने कित्येत दिवसांपासून मृतदेह रस्त्यांतच पडून आहेत. 

इक्‍वेडोरमध्ये कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचे प्रचंड हाल सुरू आहेत. येथील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या गुआयकिलमध्ये दहशतीमुळे रस्ते सुनसान झाले आहेत. सर्व सेवा-सुविधांवर परिणाम झालेला आहे. कोरोनाग्रस्तांमुळे सर्वच यंत्रणांवर ताण आला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर ही यंत्रणा कधीही मोडून पडू शकते. रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी बेड नाहीत. शवागार, स्मशान येथे मृतदेहांचे ढीग लागले आहेत. संपूर्ण शहरात अशी जागा राहिली नाही जिथे मृतदेह ठेवता येतील. त्यामुळे लोकांनी मृतदेह घरासमोरच ठेवून दिले आहेत. मृतदेह उचलण्यासाठी कुणीच मिळत नाही आहे. येथे कोरोनामुळे किती मृत्यू झाले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोरोना व्हायरसमुळे इक्‍वेडोरमध्ये 180 जणांचा मृत्यू झाला असून संसर्गाची 3646 प्रकरणे समोर आली आहेत.