Wed, Nov 21, 2018 20:17होमपेज › International › कॅलिफोर्नियात बारमध्ये गोळीबार; १३ जण ठार

कॅलिफोर्नियात बारमध्ये गोळीबार; १३ जण ठार

Published On: Nov 08 2018 5:21PM | Last Updated: Nov 08 2018 5:27PMकॅलिफोर्निया (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

कॅलिफोर्नियातील दक्षिण भागातील थाउजंड ओक्स येथे एका डान्सबारमध्ये झालेल्या गोळीबारात १३ जण ठार झाले आहेत. ज्या संशयिताने हा गोळीबार केला त्यालाही पोलिसांनी ठार केले आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, थाउजंड ओक्स येथील बॉर्डरलाईन बार ॲन्ड ग्रीलमध्ये ही घटना घडली आहे. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी बारमध्ये हजारो लोक होते. विशेषत: कॉलेजमधील मुले- मुली अधिक होते.

याचवेळी उंच आणि तोंडांवर कापड बांधलेला एका व्यक्त बारमध्ये शिरला आणि त्याने प्रथम दरवाज्याजवळी कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामुळे भयभीत झालेले लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावले. काही जणांनी खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले आहे.