Mon, May 25, 2020 10:25होमपेज › Goa › हडफडेत हॉटेल मालकिणीच्या खुनाचा प्रयत्न; वेटरला अटक 

हडफडेत हॉटेल मालकिणीच्या खुनाचा प्रयत्न; वेटरला अटक 

Last Updated: Dec 22 2019 1:17AM
बार्देश ः प्रतिनिधी 

हडफडे बार्देश येथील एका खासगी हॉटेलच्या मालकिणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिझोराम येथील लालरीनुनाज फकझुल या वेटर काम करणार्‍या तरुणास शुक्रवारी हणजूण पोलिसांनी अटक केली. संशयित फकझुल याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती निरीक्षक सुरज गावस यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित लालरीनुनाज फकझुल याने हॉटेल मालकिणीच्या कक्षात गुपचूप प्रवेश करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर उशीने तोंड दाबून तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला असता इतर कर्मचार्‍यांनी संशयित फकझुल याला पकडले व त्यानंतर हणजूण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस यांनी तात्काळ कारवाई करून संशयितास ताब्यात घेतले. तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित लालरीनुनाज फकझुल याची सात दिवसांच्या रिमांडवर हणजूण पोलिस स्थानकाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.