Wed, May 27, 2020 18:37होमपेज › Goa › गोव्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात

गोव्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात

Last Updated: May 22 2020 1:32AM

सुरक्षित अंतर ठेवणे तसेच विद्यार्थ्यांना मास्क परिधान करुन परिक्षा घेण्यात येत आहेत.पणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोव्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला इंग्रजी पेपरने आज गुरुवारपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांचे सॅनिटायझेशन करणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच विद्यार्थ्यांना मास्क परिधान करणे या नियमांचे पालन केले जात आहे. शिक्षण मंडळाकडून यावर देखरेख ठेवली जात आहे. 

वाचा : गोवा : राज्यात रुग्णांची संख्या 39 वर

दहावीच्या परीक्षेला राज्यातील १९ हजार ६८० विद्यार्थी बसले आहेत. यात ९ हजार ७९० मुले व ९ हजार ९८० मुलींचा समावेश आहे. सदर परीक्षा २९ मुख्य व १७९ उपकेंद्रांवर घेतली जात आहे. परीक्षेसाठी केंद्रात जाताना विद्यार्थ्यांनी गर्दी करु नये म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शिक्षण मंडळाचे अधिकारी तसेच शिक्षकांकडून सुध्दा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनव्दारे तपासणी केली जात आहे.

वाचा : आणखी ९ जण  कोरोनाबाधित