Thu, May 28, 2020 05:25होमपेज › Goa › विशेष अधिवेशन असल्याने म्हादईसंबंधी स्थगन प्रस्ताव फेटाळला: सभापती पाटणेकर 

विशेष अधिवेशन असल्याने म्हादईसंबंधी स्थगन प्रस्ताव फेटाळला: सभापती पाटणेकर 

Last Updated: Jan 07 2020 7:20PM

सभापती राजेश पाटणेकरपणजी: प्रतिनिधी

म्हादईचा विषय सर्वांचा जिव्हाळ्याचा असून त्याबाबतीत सर्व चाळीसही आमदार एकजुठ आहेत. मात्र, मंगळवारचे एक दिवशीय अधिवेशन हे विशेष असल्याने त्यात म्हादई विषयी स्थगन प्रस्ताव आणण्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले. 

विधानसभेच्या मंगळवारी झालेल्या एक दिवशीय  अधिवेशनात विरोधकांनी म्हादई विषयी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती पाटणेकर यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पर्वरी येथील विधानसभा संकुलात आपल्या कक्षात अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सभापती पाटणेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचा कालावधी   आणखी 10 वर्षांनी वाढवण्याचे विधेयक केंद्र सरकारकडून संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात  आले होते. या  विधेयकाला देशातील सर्व राज्यांकडून 10 जानेवारीच्या आत मंजूरी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची सूचना आली होती. त्यामुळे सदर विधेयकाला राज्य विधानसभेची मान्यता मिळवण्यासाठी हे खास अधिवेशन मंगळवारी बोलावण्यात आले होते. राज्य विधानसभेचे नववर्षातील पहिले अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण झाले.