Tue, Jul 14, 2020 09:59होमपेज › Goa › गोवा : कोरोनाचा आणखी एक रुग्ण पॅाझिटिव्ह

गोवा : कोरोनाचा आणखी एक रुग्ण पॅाझिटिव्ह

Last Updated: Apr 04 2020 2:32PM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा  

गोव्यात आणखी एका कोरोना रुग्णाची भर पडली आहे. विदेशात जाऊन आलेल्या सांतइस्तेव्ह येथील एकाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. गोमेकॉला मिळालेल्या २५ नमुन्यांपैकी एकाचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता सात झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. 

वाचा : गोव्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका

विश्वजित राणे यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनूसार, २५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती सांतइस्तेव्ह येथील असून त्याला कोविड 19 इस्पितळात दाखल करण्यात़ आले आहे. आतापर्यंत राज्यात सात रुग्ण आढळले असल्याचे राणे यांनी सांगितले आहे. 

गोमेकॉतील २५ नमुन्यांचा अहवाल आला आहे. यातील २४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या ७ कोरोना रुग्णापैकी ५ रुग्ण हे तिसवाडी तालुक्यातील आहेत. विदेशातून परतलेल्या सांतइस्तेव्ह बेटावरील सातवा रुग्ण मिळून आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णामध्ये एक रुग्ण मांद्रे, एक सासष्टी आणि पाच रुग्ण हे तिसवाडीतील आहेत.

वाचा :गोव्यात अडकलेल्‍या नफीसा अलींना मुख्यमंत्री कार्यालयातून मदतीचा हात