Mon, May 25, 2020 14:11होमपेज › Goa › गोवा : वाळू व्यवसायिकांनी घेतली दिगंबर कामत यांची भेट

गोवा : वाळू व्यवसायिकांनी घेतली दिगंबर कामत यांची भेट

Last Updated: Jan 23 2020 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात वाळू उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढावा, या मागणीसाठी वाळू व्यवसायिक, वाहतूकदार, क्रेडाई व बिल्डरर्स असोसिएशन ऑफ इंडिया  (बीएआय) च्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची पर्वरी येथील सचिवालयात बुधवारी भेट घेतली.

सदर विषयावर संबंधीत अधिकार्‍यांकडे चर्चा केली असून त्यांना सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश दिले असल्याचे आश्‍वासन दिगंबर कामत यांनी शिष्टमंडळाला दिले.

कामत म्हणाले, राज्यात सध्या वाळूची टंचाई निर्माण झाल्याने या क्षेत्राशी संबंधीत घटकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात वाळू व्यवसायिक तसेच संबंधीतांनी भेट घेऊन गार्‍हाणे मांडले.