Thu, May 28, 2020 06:08होमपेज › Goa › गोवा : ‘सीएए’च्या समर्थनार्थ उद्या जनजागृती रॅली

गोवा : ‘सीएए’च्या समर्थनार्थ उद्या जनजागृती रॅली

Last Updated: Jan 03 2020 1:42AM

रॅलीची माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरपणजी : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा ३ जानेवारी रोजी (शुक्रवार) आझाद मैदानात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (सीएए) जनजागृती रॅलीला संबोधित करतील. या रॅलीला राज्यभरातून सुमारे २६ ते २७ हजार कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गुरूवारी सांगितले.

अधिक वाचा : गोवा : विधानसभा उपसभापतींकडे पोर्तुगीज पासपोर्ट; उद्या फैसला  

येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेंडूलकर म्हणाले, की भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमल्यानंतर गोव्याला पहिल्यांदाच नड्डा भेट देणार आहेत. येथील ईडीसी पाटो येथून सायंकाळी ३.३० वाजता सुरू होणार्‍या रॅलीमध्ये पक्षाचे मंत्री आणि आमदार यांच्यासह सुमारे २६ ते २७ हजार कायकर्ते उपस्थित राहणार आहेत. या रॅलीचे त्यानंतर आझाद मैदानात जाहीर सभेत रुपांतर होईल. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील या रॅलीला संबोधित करतील. भाजपाप्रणित राज्य सरकारने या कायद्यास यापूर्वीच पाठिंबा दर्शविला आहे. सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक आज राज्यात दाखल होणार असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.

तेंडुलकर म्हणाले की, नागरिकत्व विषयक केंद्रीय कायद्याला केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही मोठा पाठिंबा मिळला आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या विदेशांमध्ये लोक ‘सीएए’च्या समर्थनार्थ बाहेर आले आहेत. मात्र, शहरी नक्षलवाद्यांप्रमाणेच काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पक्ष, बसप सारखे काही राजकीय पक्ष केवळ विरोधासाठी या कायद्याला विरोध करीत आहेत. राज्यसभेत भाजपाला बहूमत नसतानाही १२४ विरूद्ध ९९ मतांनी या कायद्याला पाठिंबा मिळाला आहे. येत्या शुक्रवारी सीएए समर्थक रॅलीसाठी गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तेंडुलकर यांनी केले. 

अधिक वाचा : खाण महामंडळ स्थापण्याचा सरकारचा विचार

गोव्यात आतापर्यंत सीएएला तितकासा विरोध झालेला नाही.  फक्त  काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या आठवड्यात सीएएबाबत काँग्रेसने काढलेल्या मोर्चात मोजुन फक्त २२८ लोकच उपस्थित होते असेही तेंडुलकर म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा सरचिटणीस सदानंद तनवडे, भाजपा प्रवक्ते दामोदर नाईक आणि निवडणूक प्रभारी गोविंद पर्वतकर उपस्थित होते.