Wed, May 27, 2020 04:45होमपेज › Goa › मसाज पार्लरवर छापा; दोघांना अटक

मसाज पार्लरवर छापा; दोघांना अटक

Published On: Aug 21 2019 1:31AM | Last Updated: Aug 21 2019 12:49AM
मडगाव : प्रतिनिधी

कोलवा येथे मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी रमेश उपाध्याय (वय 42, मुंबई) आणि जिनिता नायक (24, ओरिसा) या संशयितांना अटक करून ओरिसा आणि पश्‍चिम बंगाल येथील युवतींची सुटका केली.

कोलवा स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी रमेश हा कोलवा येथे वेश्या व्यवसायासाठी ग्राहक शोधत होता. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे पाठविले. व्यवहार पक्‍का करून रमेशने ग्राहकाला कोलवा येथील मसाज पार्लरमध्ये नेले. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर पार्लरवर छापा टाकला आणि संशयित रमेशसह महिला दलाल जिनिता यांना अटक केली आणि ओरिसा व प. बंगाल येथील दोन युवतींची सुटका केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर कारवाई केली. कोलवा पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सपना गावस, पोलिस कॉन्स्टेबल अजय नाईक, विकास कौशिक, अंजली पंडित, दीपस्वी मळीक यांनी सदर कारवाई केली.