Fri, May 29, 2020 21:35होमपेज › Goa › पणजी मनपाच्या महापौरपदी उदय मडकईकर बिनविरोध

पणजी मनपाच्या महापौरपदी उदय मडकईकर बिनविरोध

Last Updated: Mar 12 2020 2:22PM

पणजी : मनपाच्या महापौरपदी उदय मडकईकरांची बिनविरोध निवडपणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी उदय मडकईकर, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. मनपा सभागृहात आयोजित विशेष बैठकीत आयुक्‍त संजीत रॉड्रिग्स यांनी घोषणा केली. मडकईकर सलग दुसर्‍यांदा मनपाच्या महापौरपदी विराजमान झाले. पणजीच्या नागरिकांना रहिवासी तसेच उत्पन्‍न दाखला त्वरीत मिळावा यासाठी एक खिडकी सुविधा राबवण्यावर भर दिला जाईल, असे महापौर मडकईकर यांनी यावेळी सांगितले.  

►वास्कोत गुलालोत्सवावर कोरोनाचा परिणाम 

महपौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवार हा अंतिम दिवस होता. मात्र मडकईकर व आगशीकर वगळता अन्‍ कुणीही अर्ज भरला नसल्याने या दोघांची निवड निश्‍चित झाली होती. गुरुवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, बाजार समिती, महिला व बाल कल्याण समिती आदी विविध समिती स्थापन करुन सदस्यांची नियुक्‍ती  करण्यात आली.

►गोवा सरकारचा राज्य निवडणूक आयोगावर दबाव? : काँग्रेस