Tue, May 26, 2020 08:34होमपेज › Goa › गोवा : विधानसभा उपसभापतींकडे पोर्तुगीज पासपोर्ट; उद्या फैसला  

गोवा : विधानसभा उपसभापतींकडे पोर्तुगीज पासपोर्ट; उद्या फैसला  

Last Updated: Jan 03 2020 1:42AM

गोवा विधानसभेचे उपसभापती तथा काणकोणचे आमदार  इजिदोर फर्नांडिसपणजी : प्रतिनिधी

गोवा विधानसभेचे उपसभापती तथा काणकोणचे आमदार  इजिदोर फर्नांडिस यांच्या कथित पोर्तुगीज पासपोर्ट प्रकरणी  पणजीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उद्या गुरुवार २ जानेवारी रोजी  निवाडा देणार आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी फर्नांडिस यांच्या विरोधात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली होती. या याचिकेवर डिसेंबर २०१९ मध्ये युक्‍तीवाद संपुष्टात आल्यानंतर न्यायदंडाधिकार्‍यांनी हा निवाडा राखून ठेवला  आहे.

उपसभापती फर्नांडिस यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे. मात्र असे असून देखील उपसभापती सारखे महत्वाचे पद सांभाळत असल्याचा आरोप करुन अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी त्यांच्याविरोधात पणजी पोलिस स्थानकात ४ ऑगस्ट २०१९ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी फर्नांडिस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीत त्यांनी फर्नांडिस यांनी पोर्तुगाल येथे  नाव नोंद केले असून त्यांच्याकडे २२ एप्रिल २०१४ पासून पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचे नमूद केले होते. या तक्रारी सोबत फर्नांडिस यांच्या कथित पोर्तुगीज पासपोर्टचा फोटो जोडण्यात आला होता.