Tue, Sep 17, 2019 04:19होमपेज › Goa › राहुल गांधी जानेवारीत गोव्यात

राहुल गांधी जानेवारीत गोव्यात

Published On: Dec 27 2018 1:06AM | Last Updated: Dec 27 2018 1:06AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  जानेवारी 2019 मध्ये गोवा दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना ते  मार्गदर्शन करणार असल्याने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 
राहुल गांधी यांच्या दौर्‍यानिमित्त उत्तर गोव्यात जाहीर सभा आयोजित केली जाईल. मात्र दौर्‍याची तारीख अद्यापही ठरली नाही. ती लवकरच निश्‍चित केली जाणार असल्याचे  काँगे्रस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

काँग्रेसकडून देशभरात राबवण्यात आलेल्या  जनसंपर्क मोहीम समाप्तीच्या पार्श्‍वभूमीवर  ते गोव्यात येत आहेत. याशिवाय  देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गोव्यात लोकसभेच्या  उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन जागा आहेत. सध्या या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहे. त्यामुळे निवडणूकीच्या दिशेने आवश्यक ती तयारी करण्याबाबत  राहूल  गांधी  दौर्‍यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. जानेवारीच्या अखेरच्या आठवडयात ते गोव्यात एक दिवसाच्या दौर्‍यावर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex