Mon, May 25, 2020 14:03होमपेज › Goa › अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर 26 अर्ज दाखल 

अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर 26 अर्ज दाखल 

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMडिचोली ः प्रतिनिधी

अक्षयतृतियेच्या शुभमुहूर्तावर बुधवारी साखळी पालिका  निवडणुकीसाठी 26 उमेदवारांनी विविध प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निर्वाचन अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. प्रभाग दोनमधून सुभाष हरवळकर, प्रणिता गवंडी, प्रसादिनी कुडणेकर, नामदेव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

प्रभाग तीन मधून विद्यमान नगरसेवक उपेंद्र कर्पे, शुभदा सावईकर यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग चार मधून विद्यमान नगरसेविका रश्मी देसाई आणि दीपिका ऊसपकर यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग पाचमधून ज्योती ब्लॅगन, उर्मी सरनाईक, रेश्मा मलीक यांनी अर्ज  दाखल केला.

प्रभाग सहामधून राया पार्सेकर, रुपेश गवंडी यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग सात मधून राजेंद्र यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग नऊमधून दशरथ आजगावकर, सिद्धेश आजगावकर तर  प्रभाग दहामधून कपिल कर्पे , आनंद काणेकर, दया काणेकर, सर्वेश गोवेकर  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

प्रभाग अकरामधून राजेंद्र आमशेकर तसेच प्रभाग बारामधून अनिल घाडी, विठोबा  घाडी, वैभवी घाडी यांनी तर प्रभाग तेरामधून राजेश  सावळ, मोहिनी गावस यांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण तीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल उशिरा विद्यमान नगरसेवक नारायण बोर्येकर यांनी अर्ज दाखल केला होता. यापूर्वी निशा पोकळे, आनंद वेरेकर, सुनील शिरोडकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची  20 एप्रिल ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर 21 रोजी अर्जांची छाननी होणार असून 23 एप्रिल रोजी अर्ज मागे  घेण्याची  मुदत आहे. आगामी दोन दिवसांत अनेक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.