Tue, May 26, 2020 04:43होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज भाजप आमदार, अधिकार्‍यांची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज भाजप आमदार, अधिकार्‍यांची बैठक

Published On: Dec 01 2018 1:04AM | Last Updated: Nov 30 2018 11:21PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शनिवारी (दि. 1) आपल्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानी भाजप आमदार व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक  घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकार्‍यांसोबत सकाळी बैठक होईल. त्यानंतर आमदार व मंत्र्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे  मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.  पर्रीकर यांची तब्येत ठीक आहे. ते  फाईल्स तसेच अन्य प्रलंबित कामांत लक्ष घालणार असल्याचेही  सूत्रांकडून सांगण्यात आले.  

पर्रीकर मागील आठ महिन्यांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्‍ली येथील एम्स इस्पितळात उपचार घेतल्यानंतर ते ऑक्टोबर महिन्यात गोव्यात परतले. मात्र, त्यांनी कामासाठी पर्वरी येथील सचिवालयात जाण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळ तसेच  गोवा राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची  (आयपीबी) बैठक आपल्या खासगी निवासस्थानी घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी  पक्षाच्या नेत्यांशीदेखील चर्चा केली होती.