Wed, May 27, 2020 06:07होमपेज › Goa › पणजीत कॅसिनो व्यावसायिकांना झटका

पणजीत कॅसिनो व्यावसायिकांना झटका

Last Updated: Oct 08 2019 1:29AM
पणजी :  प्रतिनिधी

कॅसिनोंच्या पणजीतील कार्यालयांच्या व्यावसायिक परवान्यांचे यापुढे नुतनीकरण न करण्याचा ठराव  पणजी मनपाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. यावेळी पणजीत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या कॅसिनो बोर्डांवर येत्या सात दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्‍त संजीत रॉड्रिग्स यांनी मनपा निरीक्षकांना दिले.

पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले, पणजीत कॅसिनोंना थारा दिला जाऊ नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्याची सुरवात या कॅसिनोंच्या पणजी येथील कार्यालयांचे व्यवसायिक परवान्यांचे नुतनीकरण न करता व्हावी. कार्यालयांचे व्यावसायिक परवान्यांचे नुतनीकरण न केल्यास त्यांना येथे व्यवसाय करण्यास मिळणार नाही. परिणामी त्यांना पणजीतून जावे  लागेल.

या निर्णयामुळे मनपाला वर्षाला 35 लाख रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागेल. परंतु, या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.