Thu, May 28, 2020 06:03होमपेज › Goa › नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दुपारी ३ नंतर 

नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दुपारी ३ नंतर 

Published On: Mar 18 2019 12:36PM | Last Updated: Mar 18 2019 1:25PM
पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजप सरकारवर संकट आले आहे. पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सभापती डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे आणि केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची  नावे  पुढे आली आहेत. नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा दुपारी तीन नंतर होईल असे यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडूलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी सकाळपासून त्यांचे पार्थिव पणजीतील भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता हे पार्थिव दर्शनासाठी कला अकादमीत आणण्यात आले आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी  मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार  सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.  नवा मुख्यमंत्री कोण असेल याचे चित्र दुपारी २ वाजल्यानंतरच स्पष्ट होईल आणि नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा दुपारी  तीन नंतर होईल असे यावेळी पत्रकारांशी बोलताना तेंडूलकर यांनी सांगितले.