Thu, Jul 02, 2020 14:50होमपेज › Goa › मडगाव नगरपालिकेच्या इमारतीला तडे

मडगाव नगरपालिकेच्या इमारतीला तडे

Published On: Aug 04 2019 4:16PM | Last Updated: Aug 04 2019 4:16PM
मडगाव: पुढारी ऑनलाईन

मडगाव शहराची शान असलेल्या व ऐतिहासीक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडगाव नगरपालिकेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. देश विदेशातून या इमारतीला पाहण्यासाठी पर्यटक येतात. शंभर वर्षे पूर्ण होऊन सुद्धा पालिकेची ही इमारत आजही लोकांना सेवा पुरवत आहे. पण पालिका चालवणाऱ्या मंडळाचे या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष आहे. इमारतीच्या दर्शनी भागाला तडे गेले आहेत तर काही ठिकाणी स्लॅब कोसळून पडलेला आहे.  

पालिकेची सदर इमारत शंभर वर्षे जुनी आहे. नुकतेच इमारतीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. लाखो रुपये खर्च करुन इमारतीचे रंगकाम करण्यात आले होते. आता या इमारतीला जागोजागी तडे जाऊ लागल्याने इमारतीला धोका निर्माण झालेला आहे. पण पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही. मात्र पालिका रस्त्यांची नावे बदलण्यात व्यस्त आहे, अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.