Mon, May 25, 2020 14:00होमपेज › Goa › बापाविरूध्दची लैंगिक अत्याचाराची तक्रार पीडितेकडून मागे

बापाविरूध्दची लैंगिक अत्याचाराची तक्रार पीडितेकडून मागे

Last Updated: Dec 21 2019 1:32AM
मडगाव ः प्रतिनिधी
बापाने स्वतःच्या  अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मडगाव पोलिस स्थानकात नोंद करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आली असून अटकेत असलेल्या संशयिताने शुक्रवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. 

सदर मुलगी दहावी इयत्तेत शिकत आहे. घरात दररोज पालकांचे भांडण होत असल्याने तणावात येऊन सदर मुलीने लैंगिक छळ झाल्याची माहिती दिली होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वडिलांना अटक झाल्यावर सदर मुलीला चुकीची जाणीव झाली. सत्यस्थिती सांगण्यासाठी मुलीने मागाहून पत्र दाखल केले असता सदर प्रकार उघडकीस आला. सध्या सदर तक्रार मागे घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार सदर घटना पाच दिवसांपूर्वी उघडकीला आली होती.पीडित अल्पवयीन मुलगी एका शाळेची विद्यार्थिनी आहे. सरकारने शाळांमध्ये मुलांशी संवाद साधण्यासाठी समुपदेशक नेमले 
होते. सदर मुलीशी संवाद साधतांना त्या समुपदेशकाला वडील आपला लैंगिक छळ करत असल्याचे त्या मुलीने सांगितले होते.  याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.