Sat, Aug 24, 2019 09:48होमपेज › Goa › ‘टु द डेझर्ट’ अपहरणावर आधारित उलिसेस रोझेल यांची माहिती

‘टु द डेझर्ट’ अपहरणावर आधारित उलिसेस रोझेल यांची माहिती

Published On: Nov 24 2018 1:21AM | Last Updated: Nov 23 2018 11:49PMपणजी : प्रतिनिधी

अर्जेंटिना पॅटागोनिया भागात घडलेल्या एका अपहरणावर ‘टु द डेझर्ट’ या चित्रपटाची कथा आधारित आहे. पॅटागोनिया येथून एका मुलीचे अपहरण केले जाते. आयुष्याच्या गजबजीतून बाहेर निघण्याचा मार्ग तिला अपहरणामुळे मिळतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक उलिसेस रोझेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इफ्फी त ‘मीट द डिरेक्टर’ सत्रात आयोजित पत्रकार परिषदेत रोझेल बोलत होते. व्यासपीठावर चित्रपटाच्या अभिनेत्री वेलेंटिना बासी उपस्थित होत्या.  

रोझेल म्हणाले, की सदर मुलगी अपहरण झाल्यानंतर घाबरून जाण्याऐवजी अपहरणातील लहान सहान गोष्टी कशाप्रकारे समजून घेते  हे चित्रटात दाखविण्यात आले आहे. आधी भांबाऊन गेल्यानंतर जसजसा वेळ जातो तसा तिला अपहरणकर्त्यांसोबत राहून वेगवेगळ्या जागी फिरण्याची सवय होते व तिला या गोष्टी आवडायला लागतात. या चित्रपटामुळे भारतात येण्याची संधी मिळाली. इफ्फी त चित्रपट प्रदर्शनावेळी सिनेमागृह हाऊसफुल्ल होतात याचा आनंद झाला.  बासी म्हणाल्या, की आपल्यासाठी हा चित्रपट क्षेत्रातील पहिला व वेगळा अनुभव होता. चित्रीकरणावेळी वाळवंट प्रदेश असल्याने खूप अडथळेही आले.