Thu, Jul 02, 2020 15:59होमपेज › Goa › इफ्फीत यंदा कोकणीचा विभाग

इफ्फीत यंदा कोकणीचा विभाग

Last Updated: Nov 05 2019 12:56AM

संग्रहीत छायाचित्रपणजी: प्रतिनिधी

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा प्रथमच कोंकणी चित्रपटांचा विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. या विभागात सात कोंकणी चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी नवी दिल्लीत दिली.  सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत मंत्री जावडेकर यांची भेट घेतली. 

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री जावडेकर म्हणाले, की यंदा अतिरिक्त चार सिनेमागृहे घेण्यात आली असून त्यामुळे अधिकाधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रतिनिधींना मिळणार आहे. या अतिरिक्त सिनेमागृहांमध्ये महोत्सवाचे सात दिवस सुमारे 100 चित्रपट पहायला मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अतिरिक्त सिनेमागृहांसंदर्भात माहिती मात्र अद्याप  मंत्री जावडेकर यांनी दिलेली नाही.