Wed, May 27, 2020 18:34होमपेज › Goa › ‘गुड फ्रायडे’, ‘ईस्टर’च्या प्रार्थना सोशल मीडियावरूनच!

‘गुड फ्रायडे’, ‘ईस्टर’ सोशल मीडियावरूनच!

Last Updated: Apr 03 2020 7:04PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

‘कोरोना विषाणू’च्या वाढत्या प्रसारामुळे गोव्यातील कॅथलिक समाजाला यंदाचा ‘गुड फ्रायडे’ आणि ‘ईस्टर’ सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. या सणांच्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून राज्यातील चर्चमध्येही प्रार्थना सभा घेण्यात येणार नसल्याने कॅथलिकांना घरातच बसून राहावे लागणार आहे. 

देशभरातील कॅथलिक समाजाच्या बांधवांना, एप्रिल महिन्यात येणार्‍या यंदाचा ‘गुड फ्रायडे’ (१० एप्रिल)आणि ‘ईस्टर’ (१२ एप्रिल) सणाला साधेपणाने आणि काहीशा बंधनात सामोरे जावे लागणार आहे. गोवा चर्चची सामाजिक संघटना म्हणून मानल्या जात असलेल्या ‘कारीतास-गोवा’चे संचालक फा. मावरीक फर्नांडिस यांनी सांगितले, की ख्रिश्चन समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाचा ‘गुड फ्रायडे’ आणि ‘ईस्टर’ सणातील कोणत्याही चर्चमध्ये ‘पॅरिशनर्स’ जातीने हजर राहणार नाहीत. सणातील अन्य कार्यक्रम वेळापत्रकानुसार होणार असले तरी चर्चमध्ये होणार्‍या प्रार्थना ‘सोशल मीडिया’वरून प्रसारीत केल्या जाणार आहेत. यामुळे कॅथलिक समाजातील लोकांच्या उत्साहाला फारशी बाधा येणार नाही, असा आपल्याला विश्वास आहे.