Thu, May 28, 2020 06:59होमपेज › Goa › षड्यंत्राचे गोमंतकीय बळी : रवी नाईक

षड्यंत्राचे गोमंतकीय बळी : रवी नाईक

Last Updated: Feb 22 2020 1:34AM
फोंडा : पुढारी वृत्तसेवा
म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवण्यासाठी केंद्र सरकारने संधी दिली असून या प्रकारामुळे गोव्यावर भविष्यात विपरीत परिणाम होईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे विद्यमान आमदार रवी नाईक यांनी  फोंड्यात पत्रकारांशी बोलताना दिला. 

ते म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळू देण्याची केंद्र सरकारने अगोदरच तयारी केली होती. या पूर्वनियोजित षड्यंत्रात गोमंतकीयांचा बळी पडला आहे. 

राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाही गोव्यावर हा अन्याय झाला असून त्याचे त्वरित निराकारण व्हायला हवे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता त्वरित कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा हा प्रश्न असल्याने राज्य सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेणे आवश्यक असल्याचे रवी नाईक म्हणाले. राज्य सरकारचे प्रतिनिधी मंडळ जरी केंद्र सरकारला यापूर्वी भेटले असले तरी केंद्र सरकारने या शिष्टमंडळाची योग्य दखल घेतली नाही, हे दुर्दैवी असल्याचे रवी नाईक म्हणाले.