Tue, May 26, 2020 06:18होमपेज › Goa › गोवा : जीसीईटी अर्ज स्वीकारण्याचे काम पुढे ढकलले

गोवा : जीसीईटी अर्ज स्वीकारण्याचे काम पुढे ढकलले

Last Updated: Mar 30 2020 1:14PM
 पणजी: पुढारी वृत्तसेवा

देशभरात धुमाकुळ घालत असलेल्या ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंदाच्या ‘गोवा समान प्रवेश परीक्षे’चे (जीसीईटी) अर्ज स्वीकारण्याचे काम बेमुदत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केली. 

राज्यात 14 एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’असल्याने सदर अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाने सदर अर्ज राज्यातील मडगाव येथील रवींद्र भवन आणि पर्वरीतील संचलनालयाच्या मुख्यालयात 26 मार्च ते 1 एप्रिल 2020 या कालावधीत स्वीकारले जाणार असल्याचे आधी जाहीर केले होते. 

‘जीसीईटी’ची तारीख मे महिन्याच्या 5 आणि 6 तारखेलाच असून अजूनही त्यात बदल झालेला नाही. मात्र, जीसीईटीचे अर्ज स्वीकारण्याबाबत लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती संचालनालयाच्या सूत्रांनी दिली आहे.