Wed, May 27, 2020 05:41होमपेज › Goa › गोवा : खाण घोटाळ्यासंदर्भातील लोकायुक्तांचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला

गोवा : खाण घोटाळ्यासंदर्भातील लोकायुक्तांचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला

Last Updated: May 12 2020 6:29PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील कथित खाण भ्रष्टाचार प्रकरणी लोकायुक्‍तांनी सादर केलेला अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या अहवालानुसार या भ्रष्टाचार प्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच अन्य अधिकार्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

 राज्यातील कथित ८८ खाण लिज नूतनीकरणांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशी अहवाल लोकायुक्‍तांनी जानेवारी महिन्यात राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालाच्या आधारे चौकशी करावे अशी शिफारस लोकायुक्‍तांकडून राज्य सरकारला करण्यात आली होती. मात्र सरकारच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खाण लीज नुतनीकरण भ्रष्टाचार संबंधीचा लोकायुक्‍तांचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला असून तसे लोकायुक्‍तांना कळवले आहे.