Mon, May 25, 2020 13:33होमपेज › Goa › जेव्हा गोव्याचे आरोग्यमंत्रीच कोरोनावरून चुकतात!

जेव्हा गोव्याचे आरोग्यमंत्रीच कोरोनावरून चुकतात!

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशात मोठ्या प्रमाणात ‘कोरोना व्हायरस’चा प्रसार वाढत असताना गोव्यात  पहिला ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण सापडला असल्याची चुकीची बातमी खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी दिली. मात्र, अवघ्या १० मिनिटात ही बातमी खोटी असून गोमेकॉच्या एका उच्च पदस्थ डॉक्टराला एका प्रयोगशाळेतून सदर माहिती मिळाली असल्याचा खुलासा राणे यांना करावा लागला. यामुळे खुद्द सरकारकडून वृताची तपासणी न करता अफवा पसरली जात असल्याबद्दल जनतेकडून टीका करण्यात येत आहे. 

वाचा - सुरेश प्रभू यांनी पत्करला एकांतवासाचा निर्णय! 

राणे यांनी दुपारी नॉर्वे येथील पर्यटकांचा अहवाल सकारात्मक आला असून त्याला गोमेकॉतील ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले. अन्य लोकांना त्याचा संसर्ग होऊ नये, म्हणून गोवा सरकार सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याची माहितीही देण्यात आली. यानंतर दहा मिनिटांत सदर बातमी खोटी असल्याचे राणे यांनी स्वत: मीडीयाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपला सांगितले. यामुळे, आधीची बातमी सोशल मीडियावर झळकली असली तरी ती खोटी असल्याचे मीडियाच्या प्रतिनिधींनी जाहीर केले आहे.