Wed, May 27, 2020 12:39होमपेज › Goa › गोव्याला मिळणार अत्याधुनिक कोरोना चाचणी यंत्र

गोव्याला मिळणार अत्याधुनिक कोरोना चाचणी यंत्र

Last Updated: May 15 2020 2:17PM

संग्रहीक छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्यातील संशयित कोरोना रुग्णांची तातडीने व जलदगतीने तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याला सुमारे १.५० कोटी रुपये किंमत असलेली आधूनिक ‘अब्बोट एम-2000 पीसीआर ’यंत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या यंत्राद्वारे २४ तासात ४८० कोरोनासंबंधी चाचण्या घेणे शक्य आहे. या यंत्रामुळे राज्यातील चाचणी करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. सदर यंत्र खरेदी करायला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आभार मानले आहे.

वाचा :गोव्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह