Thu, Jul 16, 2020 06:17होमपेज › Goa › किनारी सफाई कंत्राट भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा : काँग्रेस 

किनारी सफाई कंत्राट भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा : काँग्रेस 

Published On: Aug 12 2019 8:06PM | Last Updated: Aug 14 2019 12:07AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील समुद्र किनारे साफ करण्यासाठी दृष्टी कंपनीला देण्यात आलेल्या किनारी सफाई कंत्राटात भ्रष्टाचार झाला असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिदषदेत केली. दृष्टी कंपनीला बेकायदेशीरपणे कंत्राट देण्यात आले आहे. सरकारने हे  किनारी भ्रष्टाचार प्रकरण सीबीआयकडे न  सोपवल्यास न्यायालयात जाण्याचा  इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, भाजप पदाधिकार्‍यांचे हितसंबध जपण्यासाठी सरकारने किनारी सफाई कंत्राट दृष्टी कंपनीला दिले आहे. केवळ सफाई कंत्राटच नव्हे तर दृष्टी कंपनीला जीवरक्षक कंत्राट देखील बेकायदेशीरपणे दिले असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदर कंत्राट देताना वित्त खात्याची मंजुरी देखील घेतलेली नाही. सरकारने सफाई कंत्राटासाठी दृष्टी कंपनीला पहिल्या 106  दिवसांसाठी 2.62 कोटी तर अडीच वर्षात 26.20 कोटी  रुपये  दिले आहेत. तर  जीवरक्षक कंत्राटासाठी सरकारने या दृष्टी कंपनीला पाच वर्षात 141.50 कोटी रुपये दिले असल्याचा आरोप त्यांनी केला.