Tue, May 26, 2020 07:34होमपेज › Goa › पंतप्रधानांसमवेत ‘आम्ही सारे चौकीदार’

पंतप्रधानांसमवेत ‘आम्ही सारे चौकीदार’

Published On: Apr 01 2019 1:06AM | Last Updated: Apr 01 2019 12:14AM
प्रतिनिधी : म्हापसा  

देशभरात चौकीदारांची फौज पंतप्रधान मोदीजींना साथ देण्यासाठी तयार आहे. या देशाचे चौकीदार आम्ही सगळे आहोत. पंतप्रधान एकटे नाहीत. देशाचे चौकीदार होण्यास आम्ही सर्वजण सक्षम आहोत, तयार आहोत. चौकीदाराची भीती वाटल्यामुळेच विरोधकांनी पंतप्रधानांना चौकीदार चोर आहेत, अशी टीका सुरू केली होती, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

करासवाडा येथे सभागृहात आयोजित ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकल्यानंतर मुख्यमंत्री सावंत उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. काँग्रेस सरकारच्या काळात कितीतरी घोटाळे होते. टू जी पासून  सैनिकांना दिलेली जमीन हडप करण्यासारखे घोटाळे समोर दिसतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 2014  ते 2019 या काळात घोटाळे दिसणार नाहीत, तर  स्वच्छतागृहापासून सर्व विकासयोजना नजरेस पडतील. नवभारत निर्मितीसाठी पंतप्रधानांनी सांगितलेला पंचसूत्री   कार्यक्रम लक्षात घ्यायला हवा. आपण खाणार नाही आणि दुसर्‍यांनाही खाऊ देणार नाही, या घोषणेमुळे पाच वर्षांच्या काळात एकही भ्रष्टाचार दिसला नाही. तिसरे सूत्र गरिबी हटाव. अटल विमा योजना राबवून अपघाती मृतांच्या कुटुंबीयांना अडीच लाखांचा धनादेश दिला. गेल्या 70 वर्षांत असा धनादेश कुणाला  मिळाला नव्हता. चौथे सूत्र आतंकवाद हटाव. पंतप्रधानांनी   दहशतवादाचा नायनाट करण्यास प्रारंभ केला आहे. सर्जिकल स्ट्राईक, उरीची लढाई व हल्लीच हवाई स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला. पाचवे सूत्र मेक इन इंडिया, स्कील इंडियाद्वारे  युवा शक्ती एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. नवभारत निर्मितीत आम्हा गोव्यातील चौकादारांना गोव्यातील दोन्ही जागा देशाच्या प्रधान चौकीदाराला सोपवून त्यांच्या देशविकासाचे स्वप्न सत्यात उतरायला हवे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.