Wed, Jul 08, 2020 13:56होमपेज › Goa › क्रीडापटूंना 30 लाखांपर्यंत अर्थसाह्य

क्रीडापटूंना 30 लाखांपर्यंत अर्थसाह्य

Published On: Jul 27 2019 1:29AM | Last Updated: Jul 27 2019 1:29AM
पणजी ः प्रतिनिधी

राज्यातील तीन क्रीडापटूंना 30 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत  अभिनंदन ठरावावेळी केली.

अनुरा  प्रभूदेसाई (बॅडमिंटन), कात्या कोएलो (विंडसर्फिंग) व राहुल प्रभूदेसाई (गिर्यारोहण) यांना  हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेे. या संबंधीची फाईल नुकतीच मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जलतरणपटू सोहन गांगुर्ली व श्रृंगी बांदेकर, डायव्हिंगमध्ये मेघन आल्मेदा व माया शानबाग, तर यश फडते यांनी स्कॉशमध्ये पदक प्राप्त केल्याबद्दल थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, याशिवाय दरवर्षी  आपआपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या 10 क्रीडांपटूंना देखील या आर्थिक  सहाय्यासाठी गृहीत धरले जाईल असेही त्यांनी सांगितले.

या अभिनंदन ठरावाला पाठींबा देताना  पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल म्हणाले की, क्रीडापटूंना पाठींबा  देण्यासंबंधीचे धोरण तयार करण्याचा  सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या धोरणांची आवश्यक्ता आहे. सदर धोरण  या वर्षा अखेर अंमलात येईल असे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्रीडा मंत्री बाबू आजगावकर व आमदार चर्चिल आलेमाव यांनी या अभिनंदन ठरावाला पाठींबा दर्शवला.