Wed, Jun 03, 2020 09:34होमपेज › Goa › गोव्यातही बँकांचा संप, आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची निदर्शने

गोव्यातही बँकांचा संप, आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची निदर्शने

Last Updated: Oct 23 2019 1:24AM
पणजी : प्रतिनिधी 

देशभरातील बँकांनी आज, मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या संपाला गोव्यातील बँकांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. बँक कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी  पणजी येथील आझाद मैदानवर जोरदार निदर्शने  केली.

यावेळी केंद्र सरकारच्या बँकांच्या विलीनीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय त्वरीत रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली. गोव्यात पाच हजार पेक्षा जादा बँक कर्मचारी आहेत. गोव्यात देखील बहुंतांश बँका बंद असल्याने दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला आहे. यात विशेष करुन व्यापार्‍यांच्या दैनंदिन व्यवहाराला त्याचा अधिक फटका बसला आहे.