Wed, May 27, 2020 18:35होमपेज › Goa › पणजी : भाजप सरकार हे गोमंतकीय विरोधी; शिवसेना

पणजी : 'भाजप सरकार गोमंतकीय विरोधी'

Published On: Aug 21 2019 5:52PM | Last Updated: Aug 21 2019 5:52PM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील भाजप सरकार हे गोमंतकीय विरोधी आहे. परप्रांतीयांच्या विरोधात त्यांचे धोरण उदासीन असल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच गणेश चतुर्थी काळात बाजारपेठेत परप्रांतीय फळे व फुले विक्रेत्यांविरोधात शिवसेना कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कामत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे सरकार ढोंगी सरकार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होत असलेल्या निष्काळजीपणाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेकांनी अपघातात आपला जीव गमावला.

काणकोण ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून त्याठिकाणी दिशाफलक देखील लावण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. या संदर्भात केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु त्याची कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.