Tue, May 26, 2020 09:29होमपेज › Goa ›  गोवा : महिला व मुलांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य -सत्यपाल मलिक 

 गोवा : महिला व मुलांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य -सत्यपाल मलिक 

Last Updated: Jan 07 2020 7:20PM

सत्यपाल मलिकपणजी : प्रतिनिधी 

राज्यातील गुन्हेगारीच्या टक्केवारी 2018 सालाच्या तुलनेत 2019 साली 10.4 टक्के घट झाली असून  पर्यटक तसेच महिला व मुलांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य  असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी गोवा विधानसभेच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनावेळी अभिभाषणावेळी केले.

म्हादईबाबत  सरकार गंभीर आहे.  गोवा ,  कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांमध्ये म्हादईच्या पाणी वाटपावरुन वाद सुरु आहे. म्हादई  त्याचे पाणी वू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यपाल मलिक म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था  नियंत्रणात असून   गुन्हेगारीच्या टक्केवारीत देखील घट झाली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या टक्केवारी  वाढ झाली आहे. 2018 साली गुन्ह्यांचा छडा लावण्याची टक्केवारी  82 टक्के होती तर 2019 साली  यात वाढ होत ती 84 टक्के झाली. यासिशवाय अमलीपदार्थां विरोधात देखील पोलिसांकडून कारवाई  केली जात आहे.   213 प्रकरणांमध्ये 5.65 कोटी रुपयांचा  84 किलो अमलीपदार्थ जप्‍त करण्यात आला आहे. याशिवाय गोवा पोलिसांकडून  ट्रॅफीक सेंटीनल योजना अपग्रेड करण्यात आली असून ई चलन सुविधा देखील सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी  सांगितले.