Thu, May 28, 2020 19:41होमपेज › Goa › गोवा सुरक्षा मंचकडून मांद्रेतून स्वरुप नाईक तर शिरोडयातून संतोष सतरकर 

गोवा सुरक्षा मंचकडून मांद्रेतून स्वरुप नाईक तर शिरोडयातून संतोष सतरकर 

Published On: Mar 11 2019 5:51PM | Last Updated: Mar 11 2019 5:51PM
पणजी : प्रतिनिधी

गोवा सुरक्षा मंचकडून  मांद्रे  व शिरोडा मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मांद्रेतून स्वरुप नाईक तर शिरोडयातून संतोष सतरकर यांना उमेदवारी दिल्याची माहिती मंचाचे निमंत्रक  सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा 19 मार्च रोजी जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेलिंगकर म्हणाले, गोवा सुरक्षा मंच लोकसभा निवडणुकांबरोबरच मांद्रे, शिरोडा व  म्हापसा  येथील पोटनिवडणुकांसाठी सज्ज झाले असून प्रचाराचा नारळही पुढील आठवडयात  फोडला जाणार आहे.

मांद्रेतून  युवा समाजसेवक स्वरुप नाईक तर  शिरोडातून  युवा नेता  संतोष सतरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हापसा पोटनिवडणूकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा रविवार 17 मार्च रोजी केली जाणार आहे. मांद्रे येथील प्रचार कार्यालयाचे 13 मार्च रोजी तर शिरोडा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 14 मार्चला केले जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

गोवा सुरक्षा मंचकडून  नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.  अन्य पक्षांतून आयात केलेल्या  नेत्यांना तसेच भ्रष्टाचार व अन्य आरोप  असलेल्यांना  कलंकीत उमेदवारांना उमेदवारी देणार नसल्याचेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकार निष्क्रीय आहे.  केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार असून देखील त्यांना खाण प्रश्‍न  सोडवता आलेला नाही. पंतप्रधानांसह भाजपचे नेते खाण प्रश्‍नी केवळ आश्‍वासने देत असल्याचा आरोपही त्यांनी  केला.

यावेळी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आत्मराम गावकर, उमेदवार स्वरुप नाईक व  संतोष सतरकर उपस्थित होते.