Tue, May 26, 2020 05:15होमपेज › Goa › पराभव दिसू लागल्याने सार्दीन वैफल्यग्रस्त: एल्विस गोम्स

पराभव दिसू लागल्याने सार्दीन वैफल्यग्रस्त: एल्विस गोम्स

Published On: Apr 23 2019 5:41PM | Last Updated: Apr 23 2019 5:41PM
मडगाव: पुढारी ऑनलाईन

भारातीय जनता पक्षाला ला मतदान केले तरी चालेल पण आम आदमी पक्षाला मतदान करू नका असे अवाहन कॉग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार फ्रांसिस सार्दीन यांनी केल्याने कोंग्रेस विरुद्ध आप असा वाद निवडणुकीच्या वेळी निर्माण झाला. भाजपची बी टिम कोण आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे असे प्रतिउत्तर आप चे उमेदवार एल्विस गोम्स यांनी दिले आहे.

आप ही भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेस कडून केला जात होता. मंगळवारी मतदानाचा नंतर कुडतरी येथे पत्रकारांनी सार्दीन यांना छेडले असता. ज्या लोकांना काँग्रेसला आपले मत द्यायचे नसेल त्यांनी भाजपसाठी मतदान केले तरी चालेल पण आपला मतदान करू नये असे आवाहन केले.

 भाजपला मतदान केले तर ते गृहीत तरी धरले जाईल पण आपला जिंकण्याची एक टक्काही गैरेंटी नाही. त्यामुळे आप ला मतदान करू नये असे अवाहन त्यांनी केले. सार्दीन यांचा हा व्हिडीओ सोशियल मिडियावर व्हायलर झाल्या नंतर सर्व उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. 

आपचे दक्षिण गोवा उमेदवार एल्विस गोम्स यांनी पत्रकारांशी बोलताना सार्दीन यांना आपला पराभव दिसू लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि बेताल वक्तव्ये करत आहेत असा आरोप केला. सार्दीन यांच्या जिंकण्याची ताकत राहिलेली नाही. ज्या अर्थी ते भाजपला मतदान करावे असे आवाहन देत आहेत त्या अर्थी भाजपची बी टीम कोण आहे हे कोण लोकांना कळून चुकले आहे असे एल्विस म्हणाले.

कुंकळी येथे एव्हीएम यंत्राच्या चाचणी दरम्यान भाजप च्या मगोमाग कोंग्रेस ला मते मिळली होती.भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत हे स्पष्ट झाल्याचे एल्विस म्हणाले.आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी काँगेस ही भाजपची बी आहे असा दावा केला.

दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सार्दीन यांच्या भाजप ला मतदान करा या आवाहनावर ट्विटर द्वारे टीका करतांना गोव्यात कॉग्रेस चे भाजपशी सूत जमले आहे त्यामुळे काँगेस ला गोव्यात युती नको होती अशी टिप्पणी केली आहे.