Thu, Jul 02, 2020 15:22होमपेज › Goa › कळंगुट येथे दीड लाखाचा  गांजा जप्त; नायजेरीयनास अटक 

कळंगुट येथे दीड लाखाचा  गांजा जप्त; नायजेरीयनास अटक 

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:03AMपणजी : प्रतिनिधी

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी कळंगुटमध्ये केलेल्या कारवाईत व्हिक्टर इगवे(34) या नायजेरीयन  नागरिकाला अटक  करून त्याच्याकडून  दीड लाख रुपयांचा गांजा जप्‍त केला.

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार,  कळंगुट येथील हॉटेल पल्मरीनापासून ते  हॉटेल सिम्बापर्यंतच्या    रस्त्यावर  दुपारी 2.45 ते संध्याकाळी  पासून 5.45  वाजेपर्यंत  ही कारवाई  करण्यात आली.  संशयित इगवे याच्याकडून  4.115 ग्रॅम एलएसडी व  105 ग्रॅम गांजा असा सुमारे  दीड लाख रुपयांचा अंमलीपदार्थ जप्‍त करण्यात आला.

संशयिताकडून यावेळी  तो वापरत असलेला  मोबाईलही जप्‍त करण्यात आला. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक राहूल  नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. संशयित इगवे याच्याविरोधात  अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  त्याला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत  पाठवण्यात आले असून त्याची कसून चौकशी  केली जात असल्याचे पथकाच्या सूत्रांनी सांगितले.