Fri, May 29, 2020 21:33होमपेज › Goa › काजूबिया, भाताला दर वाढवून द्या

काजूबिया, भाताला दर वाढवून द्या

Last Updated: Feb 08 2020 10:09PM
काणकोण : पुढारी वृत्तसेवा

काणकोण तालुका हा शेतीप्रधान आहे. येथील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळत नसल्यामुळे नुकसानी सोसावी लागत असून  शेती करणे परवडत नाही. काणकोण मधील शेतकर्‍यांना यंदा काजूबियांसाठी 200 रुपये व भाताला 20 रुपये असा वाढवून दर  देण्यात यावा, अशी मागणी कोणकोण मधील सुमारे 300 काजू बागायतदार व शेतकर्‍यांनी काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतिदास गावकर यांच्याकडे शुक्रवारी निवेदन सादर करून केली.

 माजी मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकार्‍यांना  निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात श्नीस्थळ पंचायतीचे सरपंच गणेश गावकर, पंचायत सदस्य  दत्ता गावकर, खोतीगावचे  माजी उपसरपंच दत्ता वेळीप, गावडोंगरीचे पंचायत सदस्य  प्रभाकर गावकर, अशोक गावकर, रजनीश गावकर  उपस्थित होते.

 निवेदन सादर केल्यावर पत्रकारांशी बोलताना   तवडकर म्हणाले, की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात गोव्यातील काजू गराला मोठी मागणी असते.  2500 ते 3000 प्रति किलो काजू गर विकला जातो. मात्र ,काजू बागायतदारांकडून अल्प दराने काजू घेतला जातो. काजूचा  दर किमान 200 रूपये प्रतीकिलो धायला हवा तसेच भाताचा खरेदी दर प्रति किलो 20 रूपये करण्याची मागणी त्यांनी केली.