Mon, May 25, 2020 12:50होमपेज › Goa › गोव्यात भाजपचा धुव्वा उडेल : गिरीष चोडणकर

गोव्यात भाजपचा धुव्वा उडेल : गिरीष चोडणकर

Published On: Apr 21 2019 8:55PM | Last Updated: Apr 22 2019 1:31AM
पणजी : प्रतिनिधी 

गोव्यात होवू घातलेल्या लोकसभा तसेच पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रचाराची आज (दि. २१) सांगता झाली. संपूर्ण प्रचारा दरम्यान राज्यात भाजप सोबत असलेला एकही घटक आम्हाला दिसला नाही. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा संघर्ष हा अन्य पक्षांशी नसून खुद्द जनतेसोबतच आहे. राज्यात लोकसभा तसेच पणजी मतदारसंघातील पोटनिवडणूक धरून भाजपचा अन्य पक्षांसोबत शून्य सहा असा पराभव होईल, असा ठाम विश्‍वास गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार गिरीष चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

चोडणकर म्हणाले, राज्यातील जनतेचा भाजपवरील एकूणच राग लक्षात घेता, राज्यात भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे निश्‍चित आहे. उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील जनता काँग्रेससोबत आहे, हे प्रचारा दरम्यान उघडपणे दिसून आले. त्यामुळे  काँग्रेसचेच उमेदवार जिंकणार असून आमचा विजय नक्की आहे, असा विश्‍वास गिरीष चोडणकर यांनी व्यक्त केला. 

शून्य सहा अशा विजयात भाजपचे शून्य तर अन्य सहा काँग्रेसचेच उमेदवार जिंकणार का ? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता चोडणकर यांनी यावर स्पष्ट उत्तर दिले नाही. भाजपचा सर्व मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. मगो ने काँग्रेसला पाठिंबा दिला असून आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्तेही काँग्रेस सोबत आहेत, असे चोडणकर यांनी सांगितले.