Tue, May 26, 2020 06:27होमपेज › Goa › फर्मागुढी अपघातात दुचाकीस्वार ठार

फर्मागुढी अपघातात दुचाकीस्वार ठार

Published On: Jun 06 2019 1:34AM | Last Updated: Jun 06 2019 1:34AM
फोंडा : प्रतिनिधी

फर्मागुढी येथे मंगळवारी  रात्री उशिरा मालवाहू ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने  मंगेशी येथील व्यंकटेश प्रकाश कामत (वय 33) हा दुचाकीस्वार ठार झाला.  

कामत दुचाकीने (जीए05 एन 8113) मंगेशी येथे जात असताना मालवाहू ट्रकला (केए63, 4897) त्याच्या दुचाकीची धडक बसली. यामध्ये तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता त्याचे निधन झाले. व्यंकटेश कामत हा अविवाहित होता. तो फातोर्डा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात कामाला होता.  फोंडा पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. दरम्यान, त्याची जामिनावर सुटका झाली.