Thu, May 28, 2020 06:14होमपेज › Goa › चांदोर अपघातात युवक ठार

चांदोर अपघातात युवक ठार

Last Updated: Feb 22 2020 1:34AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

चांदोर येथे भरधाव दुचाकी हाकून दुसर्‍या दुचाकीला मागून धडक दिल्याने बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात अल्विनो डायस (25, कुडतरी) हा दुचाकी चालक ठार झाला. मायणा कुडतरी पोलिसांनी दुचाकी चालक जॉयलान मार्कस (25, गिरदोली - चांदोर) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 279, 337, 304(अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. 19 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. जॉयलॉन मार्कस आपली जीए-08- एएल -7737 या क्रमांकाची दुचाकी घेऊन चांदोर येथील रेल्वे गेट ओलांडून कोत्ताच्या दिशेने जात होता. त्याचवेळी अल्विनो डायस हा आपली जीए-08- क्यू -7852 क्रमांकाची ऍक्टिव्हा स्कूटर घेऊन त्याच दिशेने जात होता. जॉयलॉन मार्कस याने भरधाव वेगाने दुचाकी हाकताना पुढे असलेल्या अल्विनो डायस याच्या दुचाकीला मागून जोरदार ठोकर दिली. या अपघातात डायस याच्या तोंडाला व डोक्याला मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. डायस याला जखमी अवस्थेत हॉस्पिसियो इस्पितळात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. डोक्याला जबर दुखापत तसेच तोंड व मेंदूला इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. शवविच्छेदानंतर मृतदेह . नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अशोक बावकर पुढील तपास करत आहेत.